SR News Logo

एस आर न्यूज पुणे — ताजी बातमी दौंड – गॅस टँकर लपवण्याचा प्रकार; पोलिसांच्या कारवाईवर नागरिकांचे प्रश्न

News Media

आज सकाळी 9.37 वाजता रोहन गायकवाड यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, 112 वर कॉल करूनही कोणतीही तात्काळ कारवाई झालेली नाही, असा गंभीर आरोप समोर आला आहे. परिसरात गॅस टँकर संशयास्पदरीत्या लपवून ठेवला असल्याची माहिती मिळूनही पोलिसांनी तत्काळ प्रतिसाद दिला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Advertisement
Ad

BRAND BOY HADAPSAR PUNE

स्थानिकांच्या मते, गॅस टँकर लपवून ठेवण्यामागे गंभीर प्रकार दडलेला असू शकतो. याबाबत पोलिसांनी योग्य तपास करावा अशी मागणी होत होती, मात्र मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी ही माहिती मिळूनही योग्य वेळी हालचाल केली नाही, असा आरोप करण्यात येत आहे.

Advertisement
Ad

विधीसेवा- करार, अर्ज व कागदपत्रे तयार करणे

गॅस टँकरसारख्या धोकादायक वाहनाला रहिवासी भागात लपवणे हा मोठा गुन्हा असून, त्यातून संभाव्य अपघात किंवा गैरकृत्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे उत्तरदायित्वाची मागणी केली आहे.

घटनास्थळी नेमके काय सुरू होते? टँकर का लपवण्यात आला? आणि 112 कॉलनंतर पोलिसांचा प्रतिसाद उशिरा का आला? याबाबत आता स्थानिकांकडून सविस्तर चौकशीची मागणी जोर धरत आहे.

More News

Thumbnail
आज हडपसर येथील माजरी रोड परिसरात पुणे महापालिकेने कारवाई केली. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
...
Thumbnail
हडपसरमध्ये कोयता गँगचा हल्ला; एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला, वाहनांची तो
...
Thumbnail
तेलंगणा पोलिसांच्या कारवाईत मोठा यश! दीड कोटींचं बक्षीस असलेला कुख्यात माओवादी बंडी प्रकाश अखेर पोलिसांना शरण आला आहे.
...